Advertisement

भुजबळांचं बरं-वाईट झाल्यास सरकार जबाबदार- पवार

भुजबळ जेष्ठ मागासवर्गीय नेते असून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील ५० वर्षांहून अधिक काळ सामाजिक जीवनात व्यतीत केला आहे. या दरम्यान, मुंबई महापौर, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, गृहमंत्री अशी अनेक पदं त्यांनी भूषवल्याचा उल्लेख पवार यांनी आपल्या पत्रात केला अाहे. त्यामुळे तुरूंगात योग्य औषधोपचार मिळणं हा छगन भुजबळ यांचा संवैधानिक अधिकार आहे आणि तोच त्यांना मिळावा, अशी अपेक्षा शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे.

भुजबळांचं बरं-वाईट झाल्यास सरकार जबाबदार- पवार
SHARES

सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा आणि विधानपरिषद सभागृहात छगन भुजबळ यांना खाजगी रुग्णालयात हलवण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीही
सरकारला पत्र लिहून त्यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. भुजबळ यांच्या औधोपचारात हयगय झाल्यास आणि त्यांची तब्येत आणखी खालावल्यास त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

अधिवेशनादरम्यान छगन भुजबळ यांना जे. जे. रुग्णालयात योग्य औषधोपचार मिळत नसल्याची चर्चा ऐकल्यानंतर पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात पत्र लिहिलं आहे.

काय लिहिलंय पत्रात?

बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी छगन भुजबळ गेल्या दोन वर्षांपासून आर्थररोड तुरूंगात आहेत. या दरम्यान त्यांची तब्येत खूपच खालावली आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणाचा निकाल अद्याप लागला नसून त्यांच्यावरील आरोप सिद्ध होईपर्यंत ते निर्दोषच आहेत, असं शरद पवार यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.

जामीन वारंवार नाकारला

निकाल लागेपर्यंत नियमानुसार जामीन मिळणं आवश्यक असतानाही त्यांना वारंवार जमीन नाकारण्यात आला आहे. तरिही ते तुरूंगात असले, तरी मी त्यावर भाष्य करणारा नाही, असं पवार यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे.

भुजबळ जेष्ठ मागासवर्गीय नेते असून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील ५० वर्षांहून अधिक काळ सामाजिक जीवनात व्यतीत केला आहे. या दरम्यान, मुंबई महापौर, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, गृहमंत्री अशी अनेक पदं त्यांनी भूषवल्याचा उल्लेख पवार यांनी आपल्या पत्रात केला अाहे. त्यामुळे तुरूंगात योग्य औषधोपचार मिळणं हा छगन भुजबळ यांचा संवैधानिक अधिकार आहे आणि तोच त्यांना मिळावा, अशी अपेक्षा शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे.

विधानपरिषदेत झाला होता गोंधळ

भुजबळ अजूनही आमदार आहेत. मात्र जे.जे. रुग्णालयात तपासणीसाठी गेल्यावर त्यांना ओपीडीच्या रांगेत उभं रहावं लागतं. भुजबळ यांना योग्य उपचार मिळत नसल्याचा दावा सदस्यांनी केला. त्यांची अँजिओग्राफी, ईसीजी रिपोर्ट अबनॉर्मल आले तरी डॉक्टर त्यांना तुरूंगात पाठवा म्हणतात. न्यायदानात जे होईल ते होईल; पण प्रशासन असं का करत आहे? असा प्रश्न विरोधकांनी केला होता.

तसंच त्यांनी मागासवर्गीय समाजासाठी दिलेलं योगदान पाहता या समाजाच्या भावनेचा विचार करता त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यायची परवानगी द्यावी, अशी मागणी मुंडे यांनी केली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा