Advertisement

मराठा आरक्षणासाठी भाजप नेत्यांनी महाराष्ट्राऐवजी दिल्लीत फिरावं- जयंत पाटील

मराठा आरक्षणाचा निर्णय केंद्राच्या हातात असल्याने भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्रात फिरण्याऐवजी दिल्लीत फिरलं तर उपयोग होईल, असं मत राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडलं.

मराठा आरक्षणासाठी भाजप नेत्यांनी महाराष्ट्राऐवजी दिल्लीत फिरावं- जयंत पाटील
SHARES

मराठा आरक्षणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्यात फिरण्याची आवश्यकता आहे, असं वाटत नाही. हा निर्णय केंद्राच्या हातात असल्याने भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्रात फिरण्याऐवजी दिल्लीत फिरलं तर उपयोग होईल, असं मत राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी मांडलं.

प्रसारमाध्यमांशी मराठा आरक्षणाच्या विषयावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणासंबंधीचा निर्णय केंद्र शासनाच्या हातात आहे. त्यामुळे भाजप (bjp) नेत्यांनी महाराष्ट्रात फिरून काही उपयोग नाही, त्यांनी दिल्लीत फिरलं तर त्याचा मराठा समाजाला उपयोग होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा- मराठा मोर्चात भाजप कार्यकर्ता म्हणून सहभागी होणार- चंद्रकांत पाटील

शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांनी बीड इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड इथं ५ जून रोजी मोर्चाची घोषणा केली आहे. या मोर्चात भाजप देखील पूर्ण शक्तीनिशी सहभागी होणार आहे. भाजपचे पदाधिकारी, नेते, आमदार-खासदार पक्षाचा झेंडा वा बॅज न लावता या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. राजकीय हितापेक्षा आम्हाला मराठा समाजाचं हित बघायचं आहे. मराठा आरक्षणासाठी जे जे काही सकारात्मक आणि रचनात्मक करण्यात येईल, तिथं आम्ही पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहोत, असंही चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी स्पष्ट केलं.  

तर, दुसरीकडे छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा समाजाला संयम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. सध्याच्या कोविड संसर्गाच्या काळात रस्त्यावर उतरून मोर्चा काढणं योग्य नाही. यामुळे अनेकांच्या जीवावर बेतू शकतं. त्यामुळे थोडा संयम बाळगून योग्य वेळी आक्रमकपणा दाखवण्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं. तसंच आपली शांत राहण्यामागची भूमिकाही स्पष्ट केली.

(ncp leader jayant patil slams maharashtra bjp on maratha reservation rally)

हेही वाचा- तर हा संभाजी महाराज आडवा येईल.., मराठा आरक्षणावर आक्रमक

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा