Advertisement

जितेंद्र आव्हाड यांची पंतप्रधानांवर पुन्हा टीका, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री ९ वाजताचा महाड इथल्या चवदार तळ्याचा फोटो ट्वीट करून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड यांची पंतप्रधानांवर पुन्हा टीका, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
SHARES

कोरोनाविरोधात (COVID 19) लढताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ९ मिनिटांचा वेळ मागितला होता. ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता आपल्या घराबाहेर दिवा पेटवण्याचं त्यांनी देशवासीयांना आवाहन केलं होतं. या आवाहनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी घरातले लाईट्स ऑफ करुन दिवे लावून एकात्मतेचं दर्शन घडवलं. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) यांनी रात्री ९ वाजताचा महाड इथल्या चवदार तळ्याचा फोटो ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) निशाणा साधला आहे.


काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

संकटाशी लढताना अंधार दूर लोटायचा असतो. ज्ञानसुर्य (डॉ.बाबासाहेब आंबेडकर) तेव्हाही तळपत होताच... आजही तळपतोच आहे. महाडची परंपरा कायम, #जय_भीम #अब_आगे_क्या, असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.


नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटवर अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे.


आव्हाडांची आधीची प्रतिक्रिया?

'भारतानं कोरोनाविरुद्धची लस शोधली, एकालाही मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत. कुठलाही गरीब उपाशी झोपणार नाही. असे भाषण मोदींकडून अपेक्षित होतं. तर त्यांनी या संकटाचाही इव्हेंट करायचं ठरवलं. म्हणे... अंधार करा आणि बॅटरी पेटवा. देशाला इतकेही मुर्खात काढू नका,' अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी आपला संताप व्यक्त केला होता.

'जे लाखो डॉक्टर्स, नर्स, वोर्डबॉय, पोलीस, सफाई कामगार, पाणी पुरवठा, वीज पुरवठा या सगळीकडे काम करणारे लोक आहेत. त्यांच्या समर्थनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये फक्त १०१ रुपये द्या आणि त्याचा स्टेट्स आपल्या व्हॉट्सॲप, फेसबुकवर अभिमानाने ठेवा', अशी विनंतीही त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला केली आहे. लक्षात ठेवा. अंधारात कधीही चांगली कामं होत नाहीत. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप. तेव्हा अंधार करू नका. अंधारात पाप करायची संधी देऊ नका. दान हे पुण्य आहे. ते उजेडात करा', असं म्हणत त्यांनी मोदींच्या आवाहनाची खिल्ली उडवली होती.हेही वाचा

कोव्हिडपासून मी माझ्या जनतेला वाचवेन, पण तुम्हाला कायदा सोडणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ‘त्यांना’ इशारा

Coronavirus Updates: मंत्रालयात मास्कशिवाय प्रवेश नाही

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा