Advertisement

कोव्हिडपासून मी माझ्या जनतेला वाचवेन, पण तुम्हाला कायदा सोडणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ‘त्यांना’ इशारा

जाणीवपूर्वक किंवा गंमत म्हणून जरी कुणी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

कोव्हिडपासून मी माझ्या जनतेला वाचवेन, पण तुम्हाला कायदा सोडणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ‘त्यांना’ इशारा
SHARES

महाराष्ट्रात कोरोनाशी (coronavirus) लढताना सगळेजण जात-पात-धर्म-पंथ विसरुन एकमेकांना मदत करत आहेत. असं असतानाही काही लोकं समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. जाणीवपूर्वक किंवा गंमत म्हणून जरी कुणी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी शनिवारी दुपारी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. 

हेही वाचा - मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे, राज ठाकरे संतापले

मरकजच्या लोकांना शोधलं

फेसबुक लाइव्हवरून संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, दिल्लीत झालेला मरकजचा (delhi markaz) प्रकार सगळ्यांनाच ठाऊक आहे. असे प्रकार महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाही. मरकजहून आजपर्यंत जितक्या लोकांची यादी आपल्याला दिल्लीतून प्राप्त झाली त्यापैकी १००% लोकांचा शोध आपण लावला असून हे सर्वजण आपल्या सरकारी विलगीकरण कक्षात आहेत. १४ एप्रिलनंतर लाॅकडाऊन उठणार की नाही हे आताच सांगता येणार नाही. पण पुढच्या सूचना येईपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणताही राजकीय, धार्मिक, क्रिडा या प्रकारचा उत्सव होणार नाही, त्याला परवानगी दिली जाणार नाही, हे लक्षात असू द्या. 

कोणत्याही थराला जाईन

जसा कोविड-१९ हा व्हायरस (covid-19) आहे, तसा आणखी एक व्हायरस आपल्या समाजात दुही माजवण्याचं काम करू पाहात आहे. जात, पात, धर्म, पक्ष, राजकारण बाजूला ठेऊन आज जणू काही संपूर्ण जग, देश, महाराष्ट्र एकवटला आहे. या एकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न मी माझ्या महाराष्ट्रात (maharashtra) सहन करणार नाही. माझ्या माता, भगिनी, बांधवांना वाचवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन, कोणत्याही टोकाचं पाऊल उचलेन.

हेही वाचा- मुंबईतील लाॅकडाऊन उठण्याची शक्यता कमीच! अन्यथा सर्व उपाययोजना फेल

मुंबईकर जिद्दी

अतिरेक्यांचे लक्ष मुंबईकडे असतं तसं या व्हायरसच लक्ष मुंबईकडे आहे. पण मुंबईमध्ये हा व्हायरस काही करू शकणार नाही. कारण मुंबईकर घट्ट, सक्षम, जिद्दी आहेत. एकजूट हे मुंबई आणि महाराष्ट्राचं वेगळं रूप आहे.

खोटेपणा खपवून घेणार नाही

जर कोणी कोणत्याही प्रकारचे फेक व्हिडिओ (fake video) मग ते नोटांना थुंकी लावून पसरवणं, वेगवेगळे इशारे देणे असं कोणी केलं तर मी माझी जनता कोविड पासून वाचवेन, पण तुम्हाला कायद्याच्या कचाट्यातून कोणीही वाचवू शकणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. 


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा