Advertisement

मुंबईतील लाॅकडाऊन उठण्याची शक्यता कमीच! अन्यथा सर्व उपाययोजना फेल

महाराष्ट्रात लाॅकडाऊनचा कालावधी वाढवण्यात येऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत. राज्यातील लाॅकडाऊन उठवल्यास सरकार करत असलेल्या सर्व उपाययोजना फेल होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

मुंबईतील लाॅकडाऊन उठण्याची शक्यता कमीच! अन्यथा सर्व उपाययोजना फेल
SHARES

कोरोनाचा संसर्ग (coronavirus) वाढू नये म्हणून संपूर्ण देशभरात १४ एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. एका बाजूला कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असताना लाॅकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे बंद होऊन देशावर आर्थिक संकट देखील घोंघावू लागलं आहे. अशा स्थितीत लाॅकडाऊन (Lockdown) वाढणार नाही, याची चर्चा सुरू असताना महाराष्ट्रात लाॅकडाऊनचा कालावधी वाढवण्यात येऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत. राज्यातील लाॅकडाऊन उठवल्यास सरकार करत असलेल्या सर्व उपाययोजना फेल होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची (Coronavirus) संख्या आता ५३७ वर गेली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्रीपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४९० होती. त्यात दिवसभरात ४७ ने वाढली आहे. या ४७ रुग्णांपैकी ४३ रुग्ण मुंबई आणि ठाण्यातले आहेत. देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रातीलच (corona patient in maharashtra) आहेत.

हेही वाचा - मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे, राज ठाकरे संतापले

चर्चा सुरू

मुंबईत (corona patient in mumbai) जागोजागी कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ठिकठिकाणचे परिसर सील (mumbai seal) केले जात आहेत. मुंबईतील १९० परिसर आतापर्यंत सील करण्यात आले आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादानंतर लाॅकडाऊन १४ एप्रिलनंतर उठवण्यात येणार की सुरूच राहणार यावर चर्चा रंगायला लागल्या. 

प्रादुर्भाव रोखणं कठीण

यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांना प्रसारमाध्यमांनी विचारलं असता ते म्हणाले, १५ एप्रिलपर्यंत राज्यातील करोनाबाधितांची संख्या कमी होण्याची सरकारला अपेक्षा आहे. परंतु सद्यस्थितीत कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. त्याकडे पाहता आपल्याला लॉकडाऊनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवावा लागू शकतो. खासकरून मुंबईसारख्या शहरांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखणं हे खूप कठीण काम आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपवण्याचा निर्णय हा पूर्णपणे विचार करुनच घेणं गरजेचं आहे. मुंबई आणि राज्यातील इतर शहरी भागांतील लॉकडाऊनचे निर्बंध सरसकट उठवले जाण्याची शक्यता कमीच असल्याचं माझं वैयक्तिक मत आहे, असं टोपे यांनी स्पष्ट केलं.  

हेही वाचा- Coronavirus Update: राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५३७ वर

तर, उपाययोजना फेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वेगवेगळ्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला होता. या वेळी झालेल्या चर्चेत लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने काढून घेण्यासंदर्भातील नियोजन राज्य सरकारने करावं आणि त्यासंदर्भात काही सल्ले अथवा सूचना असल्यास त्या केंद्र सरकारला कळवाव्यात असं आवाहन पंतप्रधानांनी केलं होतं. परंतु लॉकडाऊनचे सर्व निर्बंध एकदम उठवल्यास मागील काही आठवड्यांपासून कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी राज्य सरकार करत असलेल्या उपाय योजनांना काहीच अर्थ उरणार नाही. एकाएकी लोकं रस्त्यावर उतरतील, गर्दी करतील, यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, असं राज्यातील तज्ज्ञांचं मत आहे.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा