Advertisement

मोदी सरकारने ‘ब्ल्यू टिक’पेक्षा कोरोनाकडे जास्त लक्ष द्यावं- नवाब मलिक

ब्ल्यू टिक असो किंवा टिकाकरण दोन्ही ठिकाणी केंद्र सरकार जनतेच्या रोषाचा सामना करतंय. ‘ब्लू टिक’ आणि लसीकरण यातील फरक पहिल्यांदा केंद्र सरकारने समजून घ्यावा, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केलं.

मोदी सरकारने ‘ब्ल्यू टिक’पेक्षा कोरोनाकडे जास्त लक्ष द्यावं- नवाब मलिक
SHARES

केंद्रातलं मोदी सरकार ‘ब्ल्यू टिक’वरून ट्विटरसाेबत वादावादी करण्यात गुंतलेलं आहे, तर दुसरीकडे देशातली जनता मात्र कोरोनापासून वाचण्यासाठी टिका अर्थात लसीकरणासाठी संघर्ष करताना दिसतेय. ब्ल्यू टिक असो किंवा टिकाकरण दोन्ही ठिकाणी केंद्र सरकार जनतेच्या रोषाचा सामना करतंय. ‘ब्लू टिक’ आणि लसीकरण यातील फरक पहिल्यांदा केंद्र सरकारने समजून घ्यावा, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केलं. 

ब्ल्यू टिक याचा अर्थ एखादं ट्विटर हँडल जनहिताला जपणारं आणि खरं आहे. ब्ल्यू टिक मिळवण्यासाठी ट्विटर हँडल सक्रीय असणं खूप गरजेचं आहे. जर एखाद्याने आपल्या ट्विटर हँडलचं नाव बदललं किंवा त्याचा वापर केला नाही, तर ब्ल्यू टिक हटवण्यात येईल. आधीच वैयक्तिक सुरक्षेबाबत केंद्राच्या निर्देशाचं पालन करण्यावरून ट्विटर आणि केंद्रामध्ये जुंपली होती. 

त्यातच ट्विटरने उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासमवेत अनेक भाजप नेत्यांच्या ट्विटर हँडलवरील ब्ल्यू टिक हटवल्याने भाजप नेत्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. नायडून यांचं ट्विटर हँडल आधी अनव्हेरिफाईड केलं आणि नंतर पुन्हा व्हेरिफाईड केलं. याचाच अर्थ त्यांचं हँडलची सत्यता काढून टाकली होती.

हेही वाचा- केंद्राच्या धमक्यांमुळेच महाराष्ट्राला लस मिळत नाही, हसन मुश्रीफ यांचा गंभीर आरोप

याबाबत मत व्यक्त करताना नवाब मलिक म्हणाले की, ज्या तऱ्हेन ट्विटरच्या बाबतीत पूर्ण भाजप पक्ष आणि केंद्रातील सरकार ब्ल्यू टिक असावी की नसावी यांत गुंतलेले दिसताहेत. तर दुसरीकडे देशातील जनता कोरोनाची लस मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. यावरून केंद्र सरकारवर जनतेतून जोरदार टीका करण्यात येत आहे. म्हणूनच केंद्राने ब्ल्यू टिक आणि टिकाकरण यांतील अंतर समजून घेतलं पाहिजे आणि देशातील लसीकरणाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे, असं नवाब मलिक (nawab malik) म्हणाले.  

याआधी ब्लू टिकच्या मुद्दयावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. ब्लू टिकसाठी मोदी सरकार संघर्ष करत आहे. कोविडची लस हवी असेल तर आत्मनिर्भर व्हा, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं. तसेच या पोस्टला प्रायोरिटी (#Priorities) हा हॅशटॅगही त्यांनी वापरला होता. यातून त्यांनी सरकार कशाला प्राधान्य देतंय हे दाखवून द्यायचं होतं.

(ncp leader nawab malik slams modi govt over twitter blue tick sign )

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा