सुरेश पाटील कालवश


सुरेश पाटील कालवश
SHARES

मुलुंड -  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई उपाध्यक्ष आणि मुलुंडमधील माजी नगरसेवक सुरेश बारकू पाटील यांचे शुक्रवारी हृदयविकारच्या धक्क्याने निधन झाले. सुरेश पाटील मुलुंड पश्चिममधून दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच 1995 मध्ये त्यांनी बेस्टचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.

''सुरेश पाटील यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या जाण्याने माझेदेखील वैयक्तिक नुकसान झाले आहे. सुरेश पाटील यांच्याकडूनच मी राजकारणाचे धडे घेतले. ऐन निवडणुकीत आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाला मुकलो आहोत." अशी भावना नगरसेवक नंदकुमार वैती यांनी व्यक्त केली.

संबंधित विषय