Advertisement

कुंभारवाड्यात झेंडा राष्ट्रवादीचाच - जयंत पाटील


कुंभारवाड्यात झेंडा राष्ट्रवादीचाच - जयंत पाटील
SHARES

मुंबई - मुंबई महानगर पालिकेत प्रभाग क्रमांक 220 मधील कुंभारवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकणार असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी केला.

बुधवारी प्रभाग 220 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रुपेश खांडके यांच्या कार्यालयाचे उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जयंत पाटील यांनी मतदार राजाला भावनिक आवाहन देखील केले. तसेच आमची मुंबई असे म्हणणाऱ्या आणि गेली कित्येक वर्ष सत्तेत राहणाऱ्या लोकांनी मुंबईकरांचा काय विकास केला? हे पाच वर्षांत पालिकेत झालेल्या घोटाळ्यातून समोर आल्याचे म्हणत त्यांनी पालिकेतील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. तसेच सी विभागातील कुंभारवाड्यात राष्ट्रवादीचाचा झेंडा फडकावा यासाठी आम्ही स्वत: लक्ष घालणार असल्याचं यावेळी ते म्हणाले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा