Advertisement

राष्ट्रवादीचा आता मुंबईत 'हल्लाबोल'


राष्ट्रवादीचा आता मुंबईत 'हल्लाबोल'
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारविरोधी हल्लाबोल अांदोलन संपूर्ण राज्यभर सुरू केले असून अाता त्याचा पुढचा टप्पा मुंबईत रंगणार अाहे. राष्ट्रवादी काँग्रेस अाता मुंबईत अाझाद मैदानात हल्लाबोल अांदोलन करणार अाहे. २८ फेब्रुवारीला होणाऱ्या या अांदोलनात मुंबईतील राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते अाणि पदाधिकाऱ्यांचा समावेश असेल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. मुंबईनंतर हल्लाबोल अांदोलनाचा पुढचा टप्पा पश्चिम महाराष्ट्र अाणि कोकण हा असेल.


सरकारने गुंतवणुकीची माहिती दयावी

हल्लाबोल आंदोलनात तरुणाईने प्रचंड प्रमाणावर सरकारविरोधात आपला रोष व्यक्त केल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
मॅग्नेटिक महाराष्ट्र अाणि मेक इन इंडियाच्या नावाखाली राज्य सरकारनं फक्त जुमलेबाजी केली अाहे. त्यामुळे नेमकी रोजगार निर्मिती किती आणि कुठे झाली, याबद्दल तरुणांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे सरकारने प्रकल्प, प्रकल्पातील गुंतवणूक याची माहिती सौजन्य दाखवून त्रस्त झालेल्या तरुणांना द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.


काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वाटाघाटी

२०१९ च्या निवडणुका अाणि आगामी काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना एकत्रित वाटचाल कशी करता येईल, याची चर्चा आज झाल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली. ही प्राथमिक चर्चा असून यापुढेही काही बैठका होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा