'वैद्यकीय प्रवेश परीक्षेमध्ये उर्दू भाषेचाही पर्याय असावा'

  Pali Hill
  'वैद्यकीय प्रवेश परीक्षेमध्ये उर्दू भाषेचाही पर्याय असावा'
  मुंबई  -  

  मुंबई - राष्ट्रीय स्तरावर घेतली जाणारी नॅशनल एलिजिबिलीटी एन्टरन्स टेस्ट (NEET) सध्या हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती, बंगाली, आसामी, तेलगू आणि तमिळ अशा आठ भाषांमध्ये घेतली जाते. मात्र या परीक्षेसाठी उर्दू भाषेचा पर्याय उपलब्ध नसणे ही खेदाची बाब आहे. त्यामुळे NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षा उर्दू भाषेतून देण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी शिक्षण संस्थेला पत्राद्वारे केली आहे. उर्दू माध्यमातून बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या आणि वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र या परीक्षेसाठी उर्दू भाषेचा पर्याय उपलब्ध नसल्याने मुलांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे सांगत आझमी यांनी येत्या काळात होऊ घातलेल्या NEET परीक्षेत उर्दूचा पर्याय उपलब्ध करुन घेण्याची मागणी केली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.