सुखदेव काशीद अध्यक्षपदी


SHARE

परळ - कामगार नेते शरद राव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या म्युनिसिपल मजदूर युनियनच्या अध्यक्षपदी अॅड. सुखदेव काशीद यांची एकमताने निवड करण्यात आली. २८ सप्टेंबरला म्युनिसिपल मजदूर युनियनची सर्वसाधारण सभा परळ येथील शिरोडकर सभागृहात पार पडली. यावेळी युनियनचे सरचिटणीस महाबळ शेट्टी, शशांक राव यांनी संघटनेच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर विविध ठराव मंजूर झाले. त्यानंतर सर्वानुमताने म्युनिसिपल मजदूर युनियनच्या अध्यक्षपदी काशिद यांची निवड करण्यात आली. सर्वसामान्य कामगाराबद्दल असलेली आपुलकी, त्यांच्या समस्या सोडवण्याची तळमळ आणि अंगी बाणवलेली निडरता यांच्या बळावर काशीद अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडतील असा विश्वास कामगार आणि अधिकारी वर्गांनी व्यक्त केला. यावेळी काशिद यांचा म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने देखील सन्मान करण्यात आला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या