Advertisement

मुंबईतील नाईट क्लब बंद होणार; अस्लम शेख यांचे संकेत

मुंबई आणि ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. असं असताना मुंबईच्या नाईट क्लबमध्ये तर कोरोनाचा फज्जा उडालेला आहे.

मुंबईतील नाईट क्लब बंद होणार; अस्लम शेख यांचे संकेत
SHARES

मुंबई आणि ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. असं असताना मुंबईच्या नाईट क्लबमध्ये तर कोरोनाचा फज्जा उडालेला आहे. त्यामुळं सर्वात आधी नाईट क्लब बंद होऊ शकतात, असे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत. विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अस्लम शेख यांनी हे संकेत दिले आहेत.

मागील काही दिवसांपासून नाईट क्लबमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला आहे. काही नाईट क्लबवरही कारवाई करण्यात आली आहे. पण त्यानं काहीही फरक पडलेला नाही, असं सांगतानाच मुंबईत पहिल्यांदा नाईट क्लब बंद होऊ शकतात, असं शेख यांनी म्हटलं.

मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. जिथं जिथं केसेस वाढत आहेत. त्या ठिकाणी अंशत: लॉकडाऊन, रात्रीची संचारबंदी आणि इतर निर्बंध लावण्यात येणार आहेत. स्थानिक प्रशासनाला तसे आदेश देण्यात आले आहेत. केसेस वाढत राहिल्यास मुंबईतही अंशत: लॉकडाऊन लागू शकतो, असं त्यांनी सांगितलं.

रात्रीची संचाबंदी लावणार

मुंबई आणि ठाण्यात कोरोनाच्या केसेस वाढत आहेत. त्यावर आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून आहे. या बैठकीत लोकल ट्रेन आणि बेस्ट बसेसमधील गर्दीवरही चर्चा झाली. तसेच लग्न समारंभांवरही चर्चा झाली, असं त्यांनी सांगितलं. रात्री अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे रात्रीची संचाबंदी लावण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा