Advertisement

पालकमंत्री बदला जिल्हा वाचवा, निलेश राणेंची जयंत पाटलांवर टीका

सांगली जिल्ह्यात कोरोनाचे २५ हून अधिक रुग्ण असलेल्या १७४ गावांतील निर्बंध आणखी कठोर करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

पालकमंत्री बदला जिल्हा वाचवा, निलेश राणेंची जयंत पाटलांवर टीका
SHARES

सांगली जिल्ह्यात कोरोनाचे (coronavirus) २५ हून अधिक रुग्ण असलेल्या १७४ गावांतील निर्बंध आणखी कठोर करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. यावरुन जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे.

सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील मैदानात उतरले, आता कोरोना आटोक्यात येणार अशा बातम्या सातत्याने काही महिन्यापूर्वी चालत होत्या. मागच्या आठवड्यात एक सर्वे झाला त्यामध्ये सांगली जिल्ह्यात परत कडक लॅाकडाऊन करावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पालकमंत्री बदला जिल्हा वाचवा, असं म्हणत निलेश राणे यांनी जयंत पाटलांवर टीका केली आहे.

केंद्रीय आरोग्य पथकाने नुकताच कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात जिल्ह्यातील परिस्थितीबद्दल केंद्रीय आरोग्य पथकाने चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर दोन्ही जिल्ह्यात पुन्हा संपूर्ण कडक लॉकडाउन लावण्याचा सल्लाही केंद्रीय पथकाने दिला आहे.

हेही वाचा- रत्नागिरी जिल्ह्यात उर्दू भवन उभारणार – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

त्यातच पालकमंत्री जयंत पाटील (jayant patil) यांच्या सांगली जिल्ह्यात कोरोनाचे २५ हून अधिक रुग्ण असलेल्या १७४ गावांतील निर्बंध आणखी कठोर करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी रुग्ण संख्या जास्त आहे, त्या भागास प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून संचारबंदी आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी रविवारपासून करण्यात आली आहे. 

निर्बंध कठोर करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये इस्लामपूर, आष्टा शहरासह बोरगाव, साखराळे, बनेवाडी, मसुचीवाडी, ताकारी, गोटखिंडी, मर्दवाडी, मिरजवाडी, कामेरी, येडेनिपाणी, तुजारपूर, शिरटे, अहिरवाडी, तांबवे आदी गावांचा समावेश आहे. तर मिरज तालुक्यातील आरग, बेडग, सुभाषनगर, मालगाव, एरंडोली, बामणोली, कवठेपिरान, माधवनगर, सलगरे, मल्लेवाडी आदी गावांचा समावेश आहे. या शिवाय तासगाव तालुक्यातील कवठेएकंद, मणेराजुरी, मांजर्डे, आरवडे, अंजनी, वडगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची, देिशग, कवठेमहांकाळ, रांजणी, लंगरपेठ, पलूस तालुक्यातील पलूस, कुंडल, रामानंदनगर, सावंतपूर, अंकलखोप, भिलवडी, बुर्ली आणि जत तालुक्यातील डफळापूर, माडग्याळ, गुळवंची, बिळूर, शेगाव, वाळेखिंडी आदी गावांचा समावेश आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा