'नवाब मलिक यांचे आरोप बिनबुडाचे'

 Fort
'नवाब मलिक यांचे आरोप बिनबुडाचे'
Fort, Mumbai  -  

सीएसटी - राष्ट्रवादीसोबत युती करणार नसल्याचं घोषित करताना, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी युती न करण्यामागे माझा शिवसेनेला छुपा पाठिंबा असल्याचे आरोप केला आहे. तो पूर्णपणे चुकीचा असून त्यात काही तथ्य नसल्याचं मुंबई शहर काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना म्हटलंय. दोन ते तीन महिन्यांपूर्वी काँग्रेसचे माजी खासदार, आमदार, वरिष्ठांसोबत आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात एक बैठक घेण्यात आली. त्यात सर्वांनी एकमताने राष्ट्रवादी काँग्रेसशी युती न करण्याचा निर्णय घेतला. तोच निर्णय दिल्ली दरबारी पक्षश्रेष्ठींसमोर मांडला. त्यांनी सर्वांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची युती न करण्याचा निर्णय माझ्या एकट्याचा नव्हता, असंही  निरुपम यांनी स्पष्ट केलंय.

Loading Comments