• आदित्य अजून बाळ - नितेश राणे
SHARE

दादर - लहान बाळावर आपण टीका करत नाही असं म्हणत युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची खिल्ली काँग्रेसचे आमदार आणि 'स्वाभिमान' संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी उडवली. त्याचबरोबर मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आपण आरक्षण मिळेपर्यंत लावून धरणार असल्याचे सांगत त्यांनी शिवसेना-भाजपावर जोरदार टीका केली. मराठा आरक्षणाबद्दल शिवसेनेची भूमिका ही 'सामना'मधून आलेल्या 'मूका'मोर्चा या व्यंगचित्रातून समोर आल्याचे म्हणतं उद्धव ठाकरेंवरही त्यांनी जोरदार हल्ला चढवला. विविध विषयांवर बेधडक व्यक्त होण्याचा वडील, नारायण राणे यांचा वारसा नितेश राजकारणात चालवत आहेत आणि ‘मुंबई लाइव्ह’ च्या ‘उंगली उठाओ’ या कार्यक्रमात नितेश राणे यांचे तेच रुप पाहायला मिळालं. 'मुंबई लाइव्ह'च्या 'उंगली उठाओ' अभियानाचं देखील नितेश राणे यांनी कौतुक केलं. शनिवारी नितेश राणे यांनी 'मुंबई लाइव्ह'च्या कार्यालयाला भेट दिली आणि विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या.

संबंधित विषय
ताज्या बातम्या