मंत्र्यांच्या भेटीला कुत्रे

 Mumbai
मंत्र्यांच्या भेटीला कुत्रे
मंत्र्यांच्या भेटीला कुत्रे
मंत्र्यांच्या भेटीला कुत्रे
See all

फोर्ट - मंत्रालय, राज्याचा कारभार चालवण्याचे ठिकाण. त्यामुळे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांची येथे सतत वर्दळ असते. सर्वसामान्यांनी येथे जायचे म्हटले तर त्यांना पूर्वपरवानगी, तपासणी अशा अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. मात्र याच मंत्रालयाच्या आवारात सध्या भटके कुत्रे सहज वावरताना दिसत आहेत.

या कुत्र्यांना ना वेळेचे बंधन, ना सुरक्षा तपासणीचे ! एक नव्हे तर पाच ते सहा भटक्या कुत्र्यांचा घोळका मंत्रालय इमारतीच्या आवारात फिरताना दिसत आहे. आता या कुत्र्यांनी सुरक्षा तपासणी कशी चुकवली, ते आत कसे शिरले असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण या प्रसंगामुळे अतिसुरक्षित आणि राज्याचा कारभार चालणाऱ्या ठिकाणची सुरक्षा कुत्रेसुद्धा भेदू शकतात हे मात्र सिद्ध झालंय.

Loading Comments