प्रभाग 132मध्ये एकाच उमेदवाराचा अर्ज!

  Pant Nagar
  प्रभाग 132मध्ये एकाच उमेदवाराचा अर्ज!
  मुंबई  -  

  घाटकोपर - पंतनगर पालिका मराठी शाळा क्र.2 मध्ये एन वॉर्डच्या उमेदवारांना अर्ज भरण्याची सोय करण्यात आली आहे. पालिका निवडणुकीचे फॉर्म 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत भरण्याची मुदत आहे. पण, आतापर्यंत या वॉर्डमधून फक्त एकाच उमेदवाराने अर्ज भरलाय. प्रभाग 132 चे राजू श्रीनिवासन नायकर यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. अर्ज भरायला शेवटचे 2 दिवस राहिले आहेत. तर, कोणत्याही बड्या पक्षातील उमेदवारांनी अजून अर्ज भरला नसल्याचं सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय किर्वे यांनी सांगितलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.