राज्य मतदार दिनावरून विरोधक आक्रमक

Vidhan Bhavan
राज्य मतदार दिनावरून विरोधक आक्रमक
राज्य मतदार दिनावरून विरोधक आक्रमक
See all
मुंबई  -  

येत्या 1 जुलैपासून दरवर्षी महाराष्ट्रात राज्य मतदार दिन साजरा करण्याचा निर्णय 'स्वीप' कार्यक्रमांंतर्गत राज्य सरकारने घेतला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने देशातील लोकशाही बळकट व्हावी, मतदारांमध्ये जागरूकता यावी, मतदान प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढावा या हेतूने 'स्वीप' (SVEEP - Systematic Voters' Education and Electoral Participation) हा कार्यक्रम हाती घेतला आहे. मात्र विरोधी पक्षांनी या विरोधात प्रश्न उपस्थित केले आहेत.

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन म्हणून 1 जुलै रोजी 'कृषी दिन' साजरा करण्यात येतो अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान सभेमध्ये दिली. मात्र 1 जुलै हा 'राज्य मतदार जागृती दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने 20 मे रोजी घेतला आहे. त्यामुळे एक प्रकारे हा वसंतराव नाईक यांचा अपमान असल्याचं सांगत अजित पवार यांनी भाजपावर टीका केली.

यावर उत्तर देताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन 'कृषी दिन' म्हणूनच साजरा होणार आहे. वसंतराव नाईक यांच्याबद्दल आदर आहे. एका दिवशी अनेक दिन साजरे होऊ शकतात असे सांगत त्यांनी अजित पवार यांच्या आक्षेपाला उत्तर दिले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.