शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधी पक्ष उतरणार रस्त्यावर

  Churchgate
  शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधी पक्ष उतरणार रस्त्यावर
  मुंबई  -  

  मुंबई - शेतकरी कर्जमाफीबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याने विरोधी पक्ष आता रस्त्यावर उतरणार आहेत. "29 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह विधिमंडळातील सर्वच विरोधी पक्ष चांदा ते बांदा राज्यव्यापी संघर्ष यात्रा काढणार आहेत," अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे.

  विधानसभेत शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या 19 आमदारांना 31 डिसेंबर 2017 पर्यंत निलंबित करण्यासाठी राज्य सरकारने प्रस्ताव मांडला होता. हा विषय विरोधकांनी लावून धरलाय. ही सरकारची दडपशाही असून शेतकरी कर्जमाफीची मागणी आणि सरकारकडून सुरू असलेल्या मुस्कटदाबीच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचे विरोधी पक्षांनी निश्चित केले आहे. या संदर्भात झालेल्या विरोधी पक्षांच्या आमदारांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीसहित एमआयएम आणि शेकापच्या आमदारांनीही सहभाग घेतला होता.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.