हा तर मनसेचा पब्लिसिटी स्टंट...

 Churchgate
हा तर मनसेचा पब्लिसिटी स्टंट...

कुलाबा - पाकिस्तानी कलाकारांना निशाणा करणं हा मनसेचा केवळ पब्लिसिटी स्टंट आहे, असा आरोप समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांनी केलाय. समाजवादी पक्षाच्या कुलाबा येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

पाकिस्तानकडून दहशतवादी गोष्टींना खतपाणी मिळत असेल, तर भारतानं पाकिस्तानशी संबंध पूर्णपणे तोडून टाकावे असंही त्यांनी या वेळी म्हटलं. एकीकडे पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा दयायचा आणि दुसरीकडे त्यांना भारतात येऊ द्यायचं नाही ही राज ठाकरे यांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका त्यांनी केली. भारतात पाकिस्तानी नागरिकांना येऊ द्यायचं की नाही, हे सरकारनं ठरवावं, राज ठाकरे यांनी ठरवू नये, असंही आझमी म्हणाले.

Loading Comments