महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात ‘महाराज’

 Dahisar
महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात ‘महाराज’

बोरिवली - महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम चांगलाच रंगलाय. एरवी जनतेचे भविष्य सांगणाऱ्या महाराज पंडितांनाही आता जनसेवा करण्यासाठी नगरसेवकपदाचे वेध लागले आहेत. दहिसर आनंद नगर वॉर्ड क्रमांक 2 मधून ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक महेश वाकोडे (महाराज) हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. या महाराजांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. त्यासाठी त्यांनी विविध नेत्यांच्या भेटी घेऊन मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आपण याच प्रभागातील शिवनेरी नगरात राहत असून गोंधळी समाजाचे नेतृत्व करीत आहोत. त्यामुळे पक्षाने आपल्याला उमेदवारी दिल्यास आपण चमत्कार घडवू, असा दावा वाकोडे यांनी केला आहे. दरम्यान वाकोडे महाराज धोतर नेसून प्रचार करीत असल्याने सध्या या विभागात हा चर्चेचा विषय बनला आहे. परंतु समाजसेवा करण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत असल्याचे वाकोडे यांनी सांगितले.

Loading Comments