Advertisement

‘सीओडी’ग्रस्तांकडून होणार संरक्षणमंत्र्यांचा सत्कार


‘सीओडी’ग्रस्तांकडून होणार संरक्षणमंत्र्यांचा सत्कार
SHARES

कांदिवली - कांदिवलीतील हजारो सीओडी प्रकल्पग्रस्त संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचा सत्कार करणार आहेत. सोमवार 14 नोव्हेंबरला हा सत्काराचा कार्यक्रम कांदिवली पूर्वेतील राजगुरू पुलाजवळच्या मनपा मैदानात संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. कांदिवलीतील सोओडी परिसरातील जुन्या धोकादायक इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न नुकताच सुटला. आमदार अतुल भातखळकर यांनी वारंवार हा प्रश्न उचलून धरला होता. संरक्षणमंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सीओडीच्या प्रश्नाबाबत भातखळकरांनी सतत पाठपुरावा केला आणि यामुळेच बेघर होऊन रस्त्यावर आलेल्या कांदिवलीकरांना पुन्हा त्यांच्या हक्काच्या घरात निवारा मिळणार आहे. या कार्यक्रमाला भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशीष शेलार, उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राचे खासदार गोपाळ शेट्टी हे प्रमुख पाहुणे असतील. चारकोप विधानसभा क्षेत्राचे आमदार योगेश सागर, दहिसरच्या आमदार मनीषा चौधरी, आमदार प्रवीण दरेकर, आमदार भाई गिरकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा