Advertisement

मनसे अध्यक्ष राज ठाकरे- पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर

मुंबईच्या शिवाजी पार्कात तोफ धडाडणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे- पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर
SHARES

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) एकाच मंचावर येणार आहे. मुंबईच्या (Mumbai) दादरमधील (Dadar) शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) भव्य सभेचं आयोजन (Mahayuti Public Meeting) करण्यात आलं असून या सभेत राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ही या सभेत जनतेला संबोधित करणार आहे. पाचव्या टप्प्यातील निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) प्रचारासाठी महायुतीची मुंबईत सांगता सभा होणार आहे. यासाठी मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत, त्यांचा मुंबईत रोड शो देखील होईल.

राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर 

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यामध्ये मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी 17 मे रोजी मुंबईत भव्य सभा पार पडणार आहे.

मुंबई, ठाणे आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रचाराच्या दृष्टिकोनातून ही सभा खूप खास असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्क मैदानावरील भव्य मंचावरून मुंबई, ठाणे आणि पालघरमधील जनतेला संबोधित करणार आहेत.

मुंबईच्या शिवाजी पार्कात तोफ धडाडणार

मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते वागीश सारस्वत यांनी अधिकृतपणे ही माहिती दिली आहे. निवडणुकीची घोषणा होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज ठाकरे यांच्या सभेसाठी शिवाजी पार्कचे मैदान बुक करण्यात आलं होतं. पण राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

महायुतीच्या सर्व लोकसभा उमेदवारांच्या समर्थनार्थ मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रिंगणात उतरले आहेत. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत सभा होणार आहे.



हेही वाचा

ठाणे : मतदान जागृतीसाठी टीएमसीतर्फे शनिवारी मिनी मॅरेथॉनचे आयोजन

मुंबई उत्तर मध्य लोकसभेतून कोणते उमेदवार निवडणूक लढवत आहेत?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा