शिवस्मारकासाठी 16 ठिकाणाहून माती आणि पाणी

 Pali Hill
शिवस्मारकासाठी 16 ठिकाणाहून माती आणि पाणी

मुंबई - शिवस्मारक बांधण्यासाठी हिंदू धर्मातील सोळा पवित्र ठिकाणाहून माती आणि पाणी आणलं जाणार असल्याची माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली.

शिवस्मारकाची जय्यत तयारी छत्रपती शिवाजी स्मारक समितीतर्फे करण्यात येत आहे. 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते भूमिपूजन होणार आहे. या भूमीपूजन कार्यक्रमाला छत्रपती घराण्यांनाही निमंत्रण देण्यात आल्याची माहिती विनायक मेटे यांनी दिली. इतिहासकार, किल्ले संवर्धन करणाऱ्या संघटना, शिवस्मारक चळवळीशी जोडलेल्या संघटनांना कार्यक्रमासाठी बोलावण्यात येणार असल्याचंही मेटे यावेळी म्हणाले.

Loading Comments