महापालिकेचे अभूतपूर्व फेर बदल

 Dadar
महापालिकेचे अभूतपूर्व फेर बदल

दादर - मुंबई महापालिकेच्या आरक्षणाच्या सोडतीत अभूतपूर्व फेर बदल झालेत. मुंबईतल्या अनेक दिग्गज नगरसेवकांना आपले प्रभाग गमावावे लागलेत. ज्यांचे वॉर्ड गायब झालेत त्यांच्या यादीत त्यापैकी शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर, शीतल म्हात्रे, आणि मनसेचे विजय कुडतडकर ,उत्तम सांडव यांचा समावेश आहे. अनेक नगरसेवकांचे प्रभाग फुटलेत. प्रभाग क्रमांक १९५एस सी साठी आरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकांमध्ये चांगलीच दमछाक होणार आहे.

मनसे,राष्ट्रवादी,भाजप यांच्या पुढे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत. परंतु शिवसेनेला जरी नगरसेवक कशोरी पेडणेकर यांचा धक्का बसला असला तरी आपला बालेकिल्ला शाबूत राखण्यासाठी महापौर स्नेहल आंबेकर यांच्या रूपाने एक चांगली संधी मिळाली आहे. प्रभागातील नागरिक जास्त करून कोकणी आणि 90% मराठा असल्याने एस सी आरक्षणासाठी नवीन चेहरा कुठून आणणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मनसेचे शाखा प्रमुख उत्तम सांडव, माजी नगरसेवक विजय कुडतडकर आणि भाजप पक्षाचा बहुचर्चित असणार नवा चेहरा अनिरुद्ध सावंत यांना मोठा फटका बसला आहे. शिवसेनेकडे दोन जेष्ठ शिवसैनिक पर्याय असल्याने इतर पक्षांचे मात्र तोंडचे पाणी पळाले आहे. वाढलेल्या प्रभागाचा शिवसेनेला फायदा असल्याचं दिसून येत आहे. परंतु काही शिवसैनिक नाखूश असले, तरी पक्षाचा दृष्टिकोन पाहता निवडणुकीत जोमाने काम करण्याची इच्छा दाखवली आहे.

Loading Comments