टी विभागात मोठे फेरबदल

  Dalmia Estate
  टी विभागात मोठे फेरबदल
  मुंबई  -  

  मुलुंड - नव्या प्रभाग रचनेनुसार टी विभागातील प्रभागातही मोठे फेरबदल झाले आहेत. प्रभाग क्रमांक 98, 99, 100, 101, 102, 103 हे अनुक्रमे 103, 104, 105, 106, 107, 108 असे झालेले आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाची नवीन प्रभाग आखणी सुरू झालेली आहे.

  प्रभाग क्रमांक 98 म्हणजेच आताच्या 103 मधील भाजपाच्या नगरसेविका श्रीमती कांबळे यांनी प्रभाग खुला झाल्याने पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण कुठल्याही प्रभागातून निवडणूक लढवण्यास सज्ज असल्याचे सांगितले.
  प्रभाग क्रमांक 99 म्हणजेच आताचा 104 देखील खुला झाला आहे. प्रभाग क्रमांक 100 म्हणजे आताचा नवीन प्रभाग क्रमांक 105 हा पुरुषांसाठी आरक्षित आहे. येथील नगरसेवक नंदकुमार वैती यांनी "कार्यकारणी सोबत बैठक घेऊन पुढील नियोजन केले जाईल परंतु निवडणूक निश्चितच लढवीन" अशी माहिती दिली.
  प्रभाग क्रमांक 101 म्हणजे आताचा प्रभाग क्र. 106 हा महिलांसाठी आरक्षित असून, येथील मनसेच्या नगरसेविका सुजाता पाठक यांनी "निवडणुकीसंदर्भात पक्ष निर्णय घेईल. परंतु पुन्हा मला पक्षाने संधी दिली तर मी निश्चित जिंकेन असा विश्वास आहे" असे सांगितले.
  वॉर्ड क्रमांक 102 म्हणजे आताचा 107 मधील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक म्हणून ओळखले जाणारे प्रकाश गंगाधरे यांना मात्र आरक्षणाबाबतीत धक्का बसला आहे. यांचा प्रभाग हा निवडणुकीसाठी ओबीसी महिला आरक्षित केले आहे. यामुळे "पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल" अशी सावध प्रतिक्रिया गंगाधारे यांनी व्यक्त केली. तसेच जुना प्रभाग क्रमांक 103 म्हणजे आताचा प्रभाग क्रमांक 108 मध्ये आरक्षण नसल्याने मनोज कोटक यांनी "निवडणुकीसंदर्भात पक्ष निर्णय घेईल त्या प्रमाणे पुढचे नियोजन केले जाईल" असे सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.