'खडसेंपेक्षा मोठे 4 नेते दाऊदच्या संपर्कात'

  Pali Hill
  'खडसेंपेक्षा मोठे 4 नेते दाऊदच्या संपर्कात'
  मुंबई  -  

  मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपर्कात असलेल्या पाच नंबरपैकी एकनाथ खडसेंच्या नंबरव्यतिरिक्त बाकीचे चार नंबर खडसेंपेक्षाही मोठ्या नेत्यांचे आहेत, असा खळबजनक आरोप हॅकर मनिष भंगाळे यानं केलाय. मनिष भंगाळे आणि अॅडव्होकेट गीतांजली लोखंडे यांनी मुंबई मराठी संघात पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली.

  मनीष भंगाळे यांनी दाऊदच्या संपर्कात असलेल्या पाच नंबरची माहिती सायबर सेलला दिली होती. त्यापैकी एक नंबर खडसेंचा असल्याचा आरोप केला होता. पोलीस यंत्रणा इतर चार नंबरची माहिती का काढत नाही? ही माहिती काढण्यास किंवा जाहीर करण्यास पोलीस यंत्रणा घाबरते का? सायबर सेल दबावाखाली काम करतंय का, असे अनेक प्रश्न मनिष भंगाळेनं उपस्थित केले.

  इतर नंबरची माहिती शोधण्यापेक्षा पोलीस, आम्हीच आरोपी असल्याप्रमाणे चौकशीसाठी बोलावत असल्याचा भंगाळे आणि वकील लोखंडे यांनी केलाय.

  मनिषनं दिलेल्या टेलिफोन क्रमांकाची ताबडतोब चौकशी केली पाहिजे. जर ते फोन बंद झाले तर देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळू शकणार नसल्याचंही लोखंडे यांनी या वेळी सांगितलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.