Advertisement

बेस्ट संपावरून राजकारण पेटलं, एकमेकांवर कुरघोड्या सुरू

बेस्टच्या संपाबाबत मनसेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमान अशा विविध राजकीय पक्षांनी प्रशासनाला धारेवर धरलं आहे. त्यामुळे संपावरून राजकारण चांगलंच पेटलं आहे.

बेस्ट संपावरून राजकारण पेटलं, एकमेकांवर कुरघोड्या सुरू
SHARES

गेल्या आठवडाभरापासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळं लाखो मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. हा संप मिटावा यासाठी अनेक बैठका व चर्चांचे आयोजन करण्यात आलं, मात्र यावर कोणताही तोडगा न निघाल्यानं अद्याप संप सुरूच आहे. दरम्यान बेस्टच्या संपाबाबत मनसेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमान अशा विविध राजकीय पक्षांनी प्रशासनाला धारेवर धरलं आहे. त्यामुळे संपावरून राजकारण चांगलंच पेटलं आहे. संपाचं श्रेय लाटण्यासाठी राजकारण्यांमध्ये चढाओढ सुरू असल्याचं चित्र सोशल मीडियावर पाहायला मिळतं. विविध राजकारण्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनावर टिकास्त्र सोडलं आहे.

संदीप देशपांडे -

पृथ्वीराज चव्हाण -

नितेश राणे -

धनंजय मुंडे -


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा