मनसेचं खड्डे-कारण


  • मनसेचं खड्डे-कारण
SHARE

मुंबई – खड्ड्यांमुळे मुंबईकर हैराण झालेले असताना पालिका प्रशासन आणि नगरसेवक मात्र खड्ड्यांचे राजकारण करत आपापली पोळी भाजण्यात मश्गूल आहेत. गेल्या दोन दिवसांपासून खड्ड्यांवरून बरेच राजकारण रंगले अाहे. मुंबईकरांच्या हातात मात्र खड्डयांवरून रंगलेले नाट्य बघणेच उरले आहे. मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी बुधवारी पालिकेच्या मुख्य अभियंत्यालाच खडड्यासाठी जबाबदार धरत रस्त्यावर आरोपीसारखे उभे केले. अभियंते आणि मनसेचे नगरसेवक आमने-सामने ठाकले आहेत. मनसेने गरज पडल्यास थेट पालिका आयुक्तांनाच रस्त्यावर उभे करण्याचा इशारा दिला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या