'मला नगरसेवक व्हायचंय'

 Santacruz
'मला नगरसेवक व्हायचंय'
'मला नगरसेवक व्हायचंय'
See all

सांताक्रूझ - महानगरपालिकेच्या निवडणुकीत ज्या उमेदवारांना नगरसेवक होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी 'मला नगरसेवक व्हायचंय' या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे.

मुंबई विद्यापीठ आणि युक्ती मीडियातर्फे सांताक्रूझ येथील मुंबई विद्यापीठाच्या आवारात 26 नोव्हेंबरला सकाऴी 10 वाजता ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत नगरसेवक कसा असावा? नगरसेवकाची कर्तव्ये आणि अधिकार, प्रभागनिहाय माहिती या विषयांवर मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष प्रा. दीपक पवार आणि मराठी अभ्यास केंद्राचे सदस्य आनंद भंडारे मार्गदर्शन करणार आहे. तर कार्यशाळेचा शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रसार माध्यमांचा नगरसेवकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन काय आहे या विषयावर जेष्ठ पत्रकार युवराज मोहिते आणि विलास आठवले आपल्या अनुभवांचा मागोवा घेत मार्गदर्शन करणार आहेत.

Loading Comments