बाबासाहेबांच्या फोटोसाठी भारिप बहुजन महासंघाचे आंदोलन

 Vidhan Bhavan
बाबासाहेबांच्या फोटोसाठी भारिप बहुजन महासंघाचे आंदोलन

नरिमन पॉईंट - भारताचं संविधान लिहण्यात डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांचा मोलाचा वाटा आहे. मात्र, मंत्रालयाच्या भिंतीवर डॉ.बाबासाहेबांचा फोटोच नाही. त्यामुळे भारिप बहुजन महासंघाने रोहीत वेमुल्लाच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून मंत्रालयात आंदोलन केलं. मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता, ब्रम्हा, विष्णू, महेश यांचे फोटो आहेत. तसाच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचाही फोटो लावून आंबेडकरी अनुयायांच्या भावनेचा आदर करावा अशी या आंदोलनादरम्यान मागणी करण्यात आली. भारिप बहुजन महासंघाचे मंत्रालयीन सचिव प्रविण भोटकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.

 

 

Loading Comments