नगरसेवक होण्यासाठी पोलीस सेवेला रामराम

Pali Hill, Mumbai  -  

शिवाजीनगर - मुंबई पोलीस दलातील एका उपनिरीक्षकाने राजकारणात एन्ट्री केलीय. चक्क पोलिसाच्या नोकरीला रामराम ठोकून पालिका निवडणुकीच्या मैदानात ते उतरले आहेत. गंगाराम कांबळे असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. वॉर्ड क्रमांक 139 मधून गंगाराम अपक्ष उमेदवार म्हणून पालिका निवडणुकीत उभे राहिले आहेत.

शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे गंगाराम कांबळे हे छेडछाड विरोधी पथकात कार्यरत होते. 30 वर्ष त्यांनी पोलीस विभागाची सेवा केली. 2 वर्ष त्यांनी उपनिरीक्षक पद सांभाळले. लोकांची सेवा करणे हाच राजकारणात येण्यामागचा उद्देश आहे, अशी भावना गंगाराम कांबळे यांनी व्यक्त केली.

Loading Comments