Coronavirus cases in Maharashtra: 441Mumbai: 235Pune: 48Islampur Sangli: 25Ahmednagar: 17Nagpur: 16Pimpri Chinchwad: 15Thane: 14Kalyan-Dombivali: 9Navi Mumbai: 8Vasai-Virar: 6Buldhana: 6Yavatmal: 4Satara: 3Aurangabad: 3Panvel: 2Kolhapur: 2Ulhasnagar: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 19Total Discharged: 42BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

लोकसभा निवडणूक मतदानादिवशी सुट्टी जाहीर

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनानं मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी कामासाठी आपल्या लोकसभा मतदार संघाच्या क्षेत्राबाहेर असतील अशा कर्मचाऱ्यांनाही लागू होणार आहे.

लोकसभा निवडणूक मतदानादिवशी सुट्टी जाहीर
SHARE

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनानं मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी कामासाठी आपल्या लोकसभा मतदार संघाच्या क्षेत्राबाहेर असतील अशा कर्मचाऱ्यांनाही लागू होणार आहे. तसंच राज्य व केंद्र शासनाची कार्यालयं, निमशासकीय कार्यालयं, सार्वजनिक उपक्रम तसंच अकृषी, कृषी आणि अन्य विद्यापीठं, अभिमत विद्यापीठं, शिक्षण संस्था आदींनाही ही अधिसूचना लागू राहील.


टक्का वाढवण्यासाठी सुट्टी

पहिल्या टप्प्यात दिनांक गुरुवार ११ एप्रिल  रोजी वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार असून त्यादिवशी संबंधित मतदार संघात सार्वजनिक सुट्टी राहील. बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या दुसऱ्या टप्प्यातील दहा मतदारसंघांसाठी गुरुवार १८ एप्रिल या मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्यात येणार आहे.


इथंही सुट्टी

तिसऱ्या टप्प्यातील जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या १४ मतदार संघातील मंगळवार २३ एप्रिल या मतदानाच्या दिवशी सुट्टी राहील. तर राज्यातील चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील नंदूरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरुर आणि शिर्डी या १७ मतदार संघात सोमवार २९ एप्रिल रोजी मतदान होणार असून या‍ दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारितीतील स्वायत्त महामंडळं, प्रतिष्ठानं आदींनाही या अधीसूचनेनुसार सुट्टी लागू राहील, असंही अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आलं आहे.हेही वाचा -

मतदान, मतमोजणी दरम्यान ३ दिवस 'ड्राय-डे'

राज्यात वीज दरवाढ होणार; वीज नियामक आयोगाची परवानगी
संबंधित विषय
ताज्या बातम्या