Advertisement

मतदान, मतमोजणी दरम्यान ३ दिवस 'ड्राय-डे'

मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, तसंच उपद्रवी ठरणाऱ्या व्यक्तींकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून निवडणूक प्रक्रियेदरम्यान मद्यसदृश्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

मतदान, मतमोजणी दरम्यान ३ दिवस 'ड्राय-डे'
SHARES

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, तसंच उपद्रवी ठरणाऱ्या व्यक्तींकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून निवडणूक प्रक्रियेदरम्यान मद्य विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी ३ दिवसांसाठी असेल. केंद्रीय निवडणूक आयोगानं हे आदेश संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांना दिले आहेत.


... म्हणून मद्यविक्रीला बंदी

देशभरात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसंच देशातील निवडणुका या मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक काळात मतदानापूर्वी आणि मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात येते. यंदा राज्यात ४ टप्यात होणाऱ्या मतदान प्रक्रियेदरम्यान मद्यसदृश्य पदार्थांची विक्री करण्यावर तसेच मद्यबाळगणाऱ्यांवर ही कारवाई केली जाणार आहे.

११ एप्रिल रोजी ७ मतदारसंघासाठी, १८ एप्रिल रोजी १० मतदारसंघासाठी, २३ एप्रिल रोजी १४ मतदारसंघासाठी आणि २९ एप्रिल रोजी १७ मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. तर २३ मे  रोजी मतमोजणी होणार आहे. या आदेशाचं उल्लघंन करणाऱ्यांचा थेट परवाना रद्द केला जातो. तसंच या काळात मद्य जवळ बाळगणाऱ्यांवरही पोलिसांकडून कारवाई  करण्यात येते.




हेही वाचा -

कुलाब्यातली झपाटलेली 'मुकेश मिल' शुटींगसाठी होणार बंद

जेव्हा प्रवासी नालासोपाऱ्याऐवजी विरारला उतरतात



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा