बॅनरबाजी विरोधात सचिन सावंत यांची तक्रार


SHARE

नरिमन पॉईंट - राज्यभरात लावण्यात येणाऱ्या बॅनरबाजी विरोधात काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. निवडणूक आयुक्तांना निवदेन देऊन यासंदर्भात त्यांनी तक्रार केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर सरकारी जाहिरातींचे बॅनर तात्काळ काढावेत, अशी मागणी सचिन सावंत यांनी निवेदनाद्वारे निवडणूक आयुक्तांकडे केलीय.

"बस स्थानके, एस. टी. बसेस, रेल्वे स्थानके तसेच विविध महापालिकांच्या परिवहन विभागाच्या बसेसवर सरकारी जाहिराती लावलेल्या आहेत. नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागल्यावर निवडणूक आयोग हे सर्व फलक काढेल अशी आशा होती. पण तसे न झाल्याने नाईलाजाने ही तक्रार करावी लागते आहे," अशी खंत सचिन सावंत यांनी व्यक्त केली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या