Advertisement

मुंबई-गोवा महामार्ग १५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा - चंद्रकांत पाटील


मुंबई-गोवा महामार्ग १५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा - चंद्रकांत पाटील
SHARES

मुंबई-गोवा महामार्ग पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. या रस्त्याची चाळण झाली आहे. शिवाय गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठपला आहे. याचा नाहक त्रास गणेशभक्तांना सहन करावा लागेल. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे यांनी लक्षवेधी उपस्थित केली. याला उत्तर देताना मुंबई-गोवा महामार्गावरचे खड्डे आणि पुलांच्या दुरुस्तीचं काम १५ ऑगस्टपर्यंत संपवण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.


चंद्रकांत पाटलांच आश्वासन

शिवाय पुढच्या पावसाळी अधिवेशनात या महामार्गावरचे खड्डे हा विषय येणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल. तर हे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करू असं, आश्वासनही पाटील यांनी दिलं.

मुंबई-गोवा महामार्ग खड्डे आणि पुलांची दुरुस्ती १५ ऑगस्ट पूर्वी केले जातील. येत्या गणेशोत्सव काळात या महामागार्वर टोल घेतला जाणार नाही, याची दक्षताही घेतली जाईल. तसंच पुढील अधिवेशनात मुंबई-गोवा महामार्गाचा विषय येणार नाही, त्यापूर्वीच हा विषय मार्गी लावला जाईल. याशिवाय २०२० पर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरील पुलाचं काम केलं जाईल अशीही ग्वाही चंद्रकांत पाटलांनी दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा