Advertisement

IIT बॉम्बेबद्दल केंद्रीय मंत्र्यांच्या विधानावर राज ठाकरे संतापले

महाराष्ट्र नवनिर्मान सेनेने आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

IIT बॉम्बेबद्दल केंद्रीय मंत्र्यांच्या विधानावर राज ठाकरे संतापले
SHARES

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्य मंत्री जितेंद्र सिंह यांनी ‘आयआयटी बॉम्बे’च्या नावाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्र नवनिर्मान सेनेने आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. 

काही दिवसांपूर्वी आयआयटीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना मंत्री सिंह यांनी आयआयटीच्या नावातील ‘बॉम्बे’ तसेच ठेवले ते ‘मुंबई’ केले नाही ही चांगली गोष्ट असल्याचे म्हटले होते. यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे विधान सरकारच्या मानसिकतेचे प्रतिक असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर त्यांनी यासंबंधी मोठी पोस्ट लिहून आपली भूमिका मांडली आहे.

राज ठाकरेंचे गंभीर आरोप

मराठी माणूस आणि मुंबईच्या मुद्द्यावर वारंवार आक्रमक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी मुंबई हे शहर महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव शिजत असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

यासाठी त्यांनी चंदीगडचे उदाहरण यावेळी दिले आहे. इतकेच नाही तर आधी मुंबई आणि नंतर संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा खळबळजनक आरोपही राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केला आहे.

“केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आयआयटीच्या कार्यक्रमात बोलताना, ‘आयआयटीच्या नावातील बॉम्बे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं असं विधान केलं’. 

यावर राज ठाकरे म्हणाले की, जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतिक आहे असं स्पष्ट दिसतंय आणि ही मानसिकता काय आहे? तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच, तिला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला. आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे.



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा