'कोर्टा'तला फैसलाराज यांच्या बाजूनं

 Pali Hill
'कोर्टा'तला फैसलाराज यांच्या बाजूनं

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांच्यावर वर्चस्व गाजवल्यानं मनसेनं पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसवर मात केलीय. राज ठाकरे यांनी प्रशांत जगताप यांना राजकारणाच्या मैदानात नव्हे तर बॅडमिंटन कोर्टवर आपला करिश्मा दाखवला. पुण्यात नुकतंच एका क्रीडा संकुलाचं उद्घाटन राज यांच्या हस्ते झालं. उद्घाटनाची औपचारिकता संपल्यानंतर राज यांनी थेट बॅडमिंटन रॅकेट हातात घेतली. समोर पुण्याचे महापौर प्रशांत जगताप. थोडाच वेळ रंगलेल्या या सामन्यात मनसे अध्यक्षांनी किमान आपण बॅडमिंटन कोर्टवर निश्चितच ‘राज’ करू शकतो, हे उपस्थितांना पटवून दिलं.

Loading Comments