Advertisement

मोदी शाहांची निवडणुकांसाठी बॉल टँपरिंग यावेळी फसणार


मोदी शाहांची निवडणुकांसाठी बॉल टँपरिंग यावेळी फसणार
SHARES

शिवाजी पार्क मैदानावर मोदीमुक्त भारताची साद घालणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्या गाजत असलेल्या चेंडू छेडछाड प्रकरणाशी सांगड घालत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाहा यांच्यावर व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.


मोदी-शाहांची उडवली खिल्ली

राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाहा यांना आपल्या कुंचल्याने फटकारलं आहे. सध्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचं चेंडूची छेडछाड केल्याचं प्रकरण चांगलंच गाजत असतानाच त्याचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी मोदी-शहांमधील दिल्लीच्या ड्रेसिंग रूममधील चर्चेच्या नावाखाली चांगलीच खिल्ली उडवली आहे.


राज ठाकरेंच्या व्यंगचित्रात

राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रात 'गोतमभाईला सांगून ऑस्ट्रेलियापासून पोलिस पेपर ( पाॅलिश पेपर ) मांगवून घासून पायला (पाहिला) पन हे बोल (चेंडू) स्विंग होएलस वाटात नाही! असं पंतप्रधान अमित शाहा यांना सांगत आहे तर; अमित शाहांच्या हातात चेंडू रेखाटून त्यावर २०१४ चे जुमले, असं नमूद केलं आहे.


हेही वाचा - 

व्यंगचित्रातून राज यांची मोदींवर पुन्हा टीका

व्यंगचित्रातून 'राज'पुन्हा बरसले

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा