Advertisement

व्यंगचित्रातून 'राज'पुन्हा बरसले


व्यंगचित्रातून 'राज'पुन्हा बरसले
SHARES

महाराष्ट्रभर दोन दिवस परतीचा पाऊस विजांच्या कडकडाटासह धो-धो बरसला. याच परतीच्या पावसाचा आधार घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा आपल्या व्यंगचित्रातून मोदींवर बरसले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासाठी सोशल मीडियावरील 'परतीचा पाऊस' डोकेदुखी ठरत असल्याचा टोला राज यांनी आपल्या व्यंगचित्रातून लगावला आहे.

'ज्या सोशल मीडियाच्या जोरावर यांनी निवडणुका जिंकल्या, तोच मीडिया आज यांच्यावर उलटला आहे. अनेक भक्तांनीही डोळ्यांवरच्या पट्ट्या काढल्यात आणि तेही सरकारवर टीका करू लागलेत', अशी टीका राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजच्या लॉन्चिंगवेळी केली होती. विकासाची मंदावलेली गती, काळ्या पैशाविरोधातील थंडावलेली मोहीम, वाढलेली महागाई यावरून मोदी सरकारवर जनता नाराज आहे. त्याचे पडसाद फेसबुक, ट्विटर, वॉट्स अॅपवरून उमटत आहेत. अमित शहा आणि अरुण जेटली यांच्यावरही टीकेची झोड उठली आहे. हा सोशल मीडियावरील परतीचा पाऊस, अर्थात उलटा फिरलेला पाऊस आहे. त्यामुळे मोदी-शहा-जेटलींची झोप उडाली आहे, अशी टीका राज यांनी व्यंगचित्रातून केली आहे.


हेही वाचा - 

राज ठाकरेंची फेसबुकवर पहिली राजकीय भूमिका - बाबासाहेबांचे स्मारक नको, ग्रंथालय असावे!

व्यंगचित्रातून राज यांची मोदींवर पुन्हा टीका


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा