Advertisement

मूठभर गुजरात्यांसाठी बुलेट ट्रेनचा घाट- राज ठाकरे


मूठभर गुजरात्यांसाठी बुलेट ट्रेनचा घाट- राज ठाकरे
SHARES

एल्फिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 23 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे पुन्हा एकदा लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे. याचाच जाब विचारण्यासाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी मेट्रो सिनेमा ते चर्चगेट स्थानक, असा 'संताप मोर्चा' काढण्यात येत आहे.

 


काय म्हणतायत राज ठाकरे?

3.06 pm - मृतांना श्रद्धांजली वाहून राज ठाकरे यांच्या भाषणाची सांगता... 

3:05 pm -  आजचा मोर्चा शांततेत काढला, मात्र यापुढचा मोर्चा अजिबात शांततेत होणार नाही...

3:02 pm - मुंबईतल्या मुठभर गुजरात्यांसाठी बुलेट ट्रेनचा घाट घातला जातोय. बुटेल ट्रेनमध्ये जाऊन ढोकळा खाण्यापेक्षा मुंबईतच ढोकळा स्वस्त मिळतो. इतका खोटारडा पंतप्रधान या आधी कधी पाहिला नाही.... हल्ली लोकांना मोदींचा आवाज ऐकून लाेकं टीव्ही बंद करतात. त्यांना शिव्या घालतात... 

3:03 pm -  त्या दिवशी जी घटना घडली, त्याचे फोटो, व्हिडिओ मला येत होते. पण मला पहावत नव्हते. मोदी, अमित शहा सारखे एक दोन माणसे देश चालविणार का? सुरेश प्रभूंनी बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणून त्यांना काढले. बुलेट ट्रेन कोणसाठी, बुलेट ट्रेनला पहिल्यांदा मी विरोध केला. नंतर बाकीचे पोपट बोलायला लागले...

3.00 pm - निवडणुकीच्या आधी मोदींनी सर्व नागरिकांच्या खात्यात १५ लाख टाकण्याचं आश्वासन दिलं होतं. पण निवडणूक जिंकल्यानंतर अमित शहा म्हणतात, हा सर्व चुनावी जुमला आहे... हे सरकार कर्जमाफी देणार नाही, हे मी आधीच सांगितलं होतं. माझी सर्व निवडणूक अधिकारी, संपादकांना आणि सर्व पत्रकारांना विनंती आहे की या सरकारच्या विरोधात बोला...

2:50 pm - नवीन सरकार येतात, नवा आशावाद दाखवतात आणि माणसं मरतात. माझ्यासकट या देशाने मोदी सरकारने विश्वास दाखवला आणि त्यानं विश्वासघात केला, याचा राग येतो...

2:45 pm - 'सोळाव्या दिवशी मनसे फेरीवाल्यांना हटवेल, मनसे रेल्वे स्टेशनवरील फूटओव्हर ब्रिज मोकळे करेल... अच्छे दिन म्हणजे आमच्या अडकलेले हाडूक आहे 

2:41pm - मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्टेजवर दाखल. भाषणाला केली सुरुवात. एल्फिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीविरोधात राज यांच्या नेतृत्वाखाली काढला मोर्चा. '15 दिवसांत फेरीवाले मुक्त करा', राज ठाकरेंचा रेल्वेला इशारा.  



2:28 pm - 'आजचा मोर्चा हा मुंबईचे स्पिरिट दाखवण्यासाठी नाही, तर मुंबईकरांची धमक दाखवायला काढला'. असे वक्तव्य मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 

2:22 pm - मनसे नेत संदीप देशपांडे यांच्या भाषणाला सुरुवात. 'कशाला हवी बुलेट ट्रेन, नियमित करा लोकल ट्रेन' 'दोन लाडू ताटावर, बुलेट ट्रेन फाट्यावर', 'राज साहेब अंगार है, बाकी सब भंगार है', कार्यकर्त्यांनी केली घोषणाबाजी. 

2:15 pm - मनसे अध्यक्ष राज ठाकरे चर्चगेट स्थानक परिसरात पोहचले. कार्यकर्त्यांनीच केला राज यांचा रास्तारोको. रस्त्यावर बसून कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. राज यांच्या नेतृत्वात मनसैनिकांचे आंदोलन. 

2:02 pm - राज ठाकरे चर्चगेट परिसरात दाखल. थोड्याच वेळात शिष्टमंडळ रेल्वे प्रशासनाला भेटणार. चर्चगेट स्थानक परिसरात पोलिसांचा बंदोबस्त. थोड्याच वेळात चर्चगेट स्थानकाच्या बाहेर राज ठाकरे करणार भाषण.

1:59 pm - 



1.50 pm - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विराट मोर्चा चर्चगेटकडे रवाना. मनसैनिकांचे राज ठाकरेंभोवती कडे. मनसेच्या या 'संताप मोर्चा'त प्रचंड गर्दी. पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.  


1:35 pm - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मेट्रो परिसरात दाखल झाले आहेत. या मोर्चात सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संख्येने मनसे कार्यकर्ते दाखल झाले आहेत. महर्षी कर्वे रस्ता बंद केल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय. चर्चगेट स्थानकातील बरेचसे प्रवेशद्वार बंद केल्यामुळे ऐन उन्हात नागरिकांना चकरा माराव्या लागत आहेत.

  

1:22 pm - मनसेच्या या 'संताप मोर्चा'त सहभागी होण्यासाठी राज ठाकरेंचे पूत्र अमित ठाकरे आणि त्यांची कन्या उर्वशी ठाकरे मेट्रो परिसरात दाखल झाले आहेत. यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांनीही मेट्रो सिनेमाजवळ गर्दी केली आहे. पण मनसेच्या या मोर्चानंतर मुंबईकरांना सुविधा उपलब्ध होतील का? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.   

  

1:20 pm - चर्चगेट स्टेशन परिसरात पोलिसांचा कडोकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मेट्रो ते चर्चगेटपर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे. शहर-उपनगरातील मनसेचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी होण्यासाठी चर्चगेट परिसरात दाखल.    


1:05 pm - मनसेच्या पदाधिकारी शर्मिला ठाकरे यांचे मोर्चास्थळी आगमन झाले. राज ठाकरेंच्या भाषणासाठी मंच सज्ज झाले असून राज ट्रकवर उभे राहून संबोधित करणार आहेत. पालघरमधून आलेल्या काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली. 


12:15 pm - मोर्चाला पोलिसांची परवानगी नाही, तरीही मोर्चाला व्हीआयपी ट्रीटमेंट. महर्षी कर्वे रोड बॅरिकेड लावून केला ब्लॉक. रस्त्यारस्त्याच्या मधोमध स्टेज बांधण्याकडे पोलिसांचा काणाडोळा.  



11:57 am - कशाला हवी बुलेट ट्रेन नियमित करा, नियमित करा लोकल ट्रेन अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. चर्चगेट स्थानकाबाहेर ऐन रस्त्याच्या मधोमध दोन ट्रक उभे करून स्टेज बांधण्याचा घाट, ट्रॅफिकची कोंडी असताना पोलिसांकडून कोणतीही कारवाई नाही. 



11:45 am - रेल्वेच्या पश्चिम विभागिय मुख्य व्यवस्थापकांना भेटल्यानंतर राज ठाकरे उपस्थित जनसमुदायाला संबोधित करणार आहेत. मुंबई पोलीसही यासंदर्भात कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या अटकेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. थोड्याच वेळात मनसेच्या मोर्चाला सुरुवात होणार आहे. 



11:40 am - मुंबई उच्च न्यायालयाने दक्षिण मुंबईत केवळ आझाद मैदानात मोर्चा आणि आंदोलन करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशाला अनुसरून मुंबई पोलिसांनी मनसेच्या मोर्चाला अजून तरी परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मेट्रो सिनेमा ते चर्चगेट स्टेशनपर्यंत हा मोर्चा जाणार आहे.  



11:34 am-  मनसे कार्यकर्त्यांनी मेट्रोच्या जवळ गर्दी करायला सुरुवात केली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकरही मोर्चास्थळी दाखल झाले आहेत. चर्चगेट स्थानकाजवळ जमलेले मनसे कार्यकर्ते मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत.  



'एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा बळी गेला. रेल्वे प्रशासन आणि सरकारनं लोकांच्या सुविधांचा विचारच आतापर्यंत केलेला नाही. सरकार लोकांना साध्या सुविधाही देऊ शकत नसेल, तर अशा सरकारचा काय उपयोग? हा मोर्चा रेल्वे प्रशासनाविरोधात असला, तरी हा मोर्चा पक्षाचा नाही. हा मोर्चा जनतेचा मोर्चा आहे, राग, चीड, व्यक्त करण्याची हीच वेळ आहे, तेव्हा भविष्यात येऊ पाहणारी याहून गंभीर परिस्थिती टाळायची असेल, तर मोर्चात सामील व्हा,'' असे भावनिक आवाहन करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईकरांना साद घातली आहे.


लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत मनसेचा धुव्वा उडाला. त्यामुळे पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसेकडे पाठ फिरवली. कार्यकर्तेच हाताशी नसल्याने पदाधिकाऱ्यांकडून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन रेल्वे प्रवाशांना केले जात आहे. मोर्चाची गर्दी रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून वाढवण्याचा निर्धार मनसेने केला आहे. या दुर्घटनेबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारतानाच राजकारणात गमावलेला सूरही पुन्हा मिळण्याचा मनसेचा प्रयत्न आहे.


हेही वाचा - 

मोर्चाला गर्दी जमवायची कशी? मनसेची रेल्वे प्रवाशांना भावनिक साद


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा