मनसेकडून राजन पारकरांना 182 वॉर्डसाठी संधी

 Shitala Devi Temple
मनसेकडून राजन पारकरांना 182 वॉर्डसाठी संधी
Shitala Devi Temple, Mumbai  -  

माहिम - माहिमच्या वॉर्ड क्रमांक 182 मधून मनसेकडून नगरसेवक पदासाठी इच्छूक असलेले राजन पारकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पारकर हे 2012 पासून निवडणुकीसाठी इच्छुक होते. तसंच पक्ष स्थापनेपासून ते वॉर्ड क्रमांक 182च्या मनसे शाखेचे शाखा अध्यक्ष आहेत.

2012 च्या निवडणुकीत हा वॉर्ड महिला आरक्षित झाल्यामुळे या ठिकाणी विद्यमान नगरसेविका श्रद्धा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. यंदा 2017 च्या निवडणुकीत देखील या वॉर्ड मधून श्रद्धा पाटील, संदीप देशपांडे, मनिष चव्हाण ही मनसेची इतर ज्येष्ठ मंडळी देखील इच्छूक असल्यामुळे पारकरांचे अस्तित्व पणाला लागले होते. पण, मनसेकडून राजन पारकर यांना वॉर्ड क्रमांक 182 साठी संधी देण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता राजन पारकर यांनी आपल्या 200 कार्यकर्त्यांसह दादरच्या महाराष्ट्र हायस्कूल येथे जाऊन उमेदवारी अर्ज भरला.

Loading Comments