• टॅब घोटाळ्याबद्दल काँग्रेसची आदित्य ठाकरेंवर टीका
SHARE

नरिमन पॉईँट - शिवसेनेने मुंबईतील महापालिका शाळांमध्ये केलेल्या टॅब वाटपात घोटाळा झाला असून, या घोटाळ्याप्रकरणी टॅबवाटपासाठी पुढाकार घेणारे युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचेही नाव आरोपींमध्ये टाकावे, अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केली आहे. टॅब घोटाळ्यासंदर्भात एका याचिकाकर्त्याने जनहित याचिका केली आहे. त्यासंदर्भात मुंबई कॉंग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलताना वाघमारे यांनी हा आरोप केला.

मुंबईतील समस्यांबाबत वाघमारे यांनी शिवसेना आणि भाजपावर चौफेर टीका केली. "संजय देशमुखांनी आयुक्तांना खड्डयाचा अहवाल सादर केला आहे, तो आयुक्त अजूनही सादर करत नाहीत. कारण त्या अहवालात भ्रष्टाचारप्रकऱणी दोषी ठरवण्यात आलेले शिवसेना व भाजपचे मर्जीतले आहेत," असे वाघमारे म्हणाले.
"वर्सोव्यातील 350 घरांमध्ये बेकायदा अतिक्रमण कऱण्यात आले आहे. ही घरे उच्चभ्रू, कलाकार व धनदांडग्यांची आहे. त्या घरांवर कारवाई करण्यासाठी म्हाडाने 2011 पासून महापालिकेला 55 लाख रुपये जमा केले आहे. मात्र अदयाप त्यांच्यावर कारवाई न करता महापालिका झोपडीधारकांवर कारवाई करत आहे. पालिकेने झोपडीधारकांवर कारवाई करणे थांबवावे अन्यथा मुंबई काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल," असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या