बाबासाहेबांना रॅलीतून आदरांजली

 wadala
बाबासाहेबांना रॅलीतून आदरांजली
बाबासाहेबांना रॅलीतून आदरांजली
बाबासाहेबांना रॅलीतून आदरांजली
बाबासाहेबांना रॅलीतून आदरांजली
See all

वडाळा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवारी रॅली काढण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या वतीनं आंबेडकर महाविद्यालयापासून ते दादर पश्चिम इथल्या सेना भवन कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या प्रमाणात एनएसएस आणि आंबेडकर महाविद्यालयाचे विद्यार्थी तसंच पाचशेहून अधिक विचार समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. विशेष म्हणजे गौतम बुद्धांची भव्य प्रतिकृती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सुबक प्रतिमा या रॅलीत सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती.

Loading Comments