Advertisement

रामभक्तांनी एक अराजकीय समिती स्थापन करावी, जयंत पाटलांचा सल्ला

राममंदिर उभारणीसाठी गोळा होणारा पैसा पारदर्शीपणाने खर्च होतोय की नाही हे बघण्यासाठी रामभक्तांनी एक अराजकीय समिती स्थापन करावी.

रामभक्तांनी एक अराजकीय समिती स्थापन करावी, जयंत पाटलांचा सल्ला
SHARES

अयोध्येतील राम मंदिरासाठी जमा करण्यात येणाऱ्या निधीत भ्रष्टाचार होत असल्यास ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. राममंदिर उभारणीसाठी गोळा होणारा पैसा पारदर्शीपणाने खर्च होतोय की नाही हे बघण्यासाठी रामभक्तांनी एक अराजकीय समिती स्थापन करावी, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. 

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, अयोध्येत राम मंदिर उभं राहावं, अशी या देशातील तमाम रामभक्तांची इच्छा आहे. राम मंदिरासाठी रामभक्त अत्यंत भक्तीभावाने मोठ्या प्रमाणावर निधी देत आहेत. पण या निधीतही काही लोक भ्रष्टाचार करत असतील तर राम यांच्यापासून किती लांब आहे आणि रामापासून ते किती लांब आहेत हे स्पष्ट होतं. रामनामाचा वापर करून विविध राजकीय आणि आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत, हे या निमित्ताने लोकांच्या समोर आलं.

हेही वाचा- ही दंडुकेशाही राज्यात चालणार नाही, चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा

त्यामुळे सर्वच राम भक्तांना माझं आवाहन आहे की, या देशात निधी, वर्गणी गोळा करणाऱ्यांनी आपला गोळा झालेला पैसा पारदर्शीपणाने खर्च केला की नाही हे बघण्यासाठी या देशातल्या राम भक्तांनी एक अराजकीय समिती स्थापन करावी. आणि त्याद्वारे कायम या राम मंदिर निर्माणातला जमा-खर्च, हिशेब हा त्रयस्त समितीने कायम निरिक्षणाखाली ठेवावा. कारण राम भक्तांची ही अपेक्षा आहे की प्राणामिकपणाने, पावित्र्य राखून राम मंदिर उभं राहावं.

दरम्यान, राम मंदिर जमीन हस्तांतरणात जर भ्रष्टाचार झाला असेल, तर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेनेने करताच भाजपकडून शिवसेनेला लक्ष्य करण्यात येऊ लागलं आहे. भाजपने शिवसेनेच्या भूमिकेविरोधात शिवसेना भवनवर केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये भर रस्त्यात राडा झाला. पोलिसांनी या प्रकरणी ४० हून अधिक भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं, तर काही शिवसैनिकांविरोधात तक्रारीचीही नोंद झाली.

(ram devotees must form a non political vigilance committee to observe allocated fund for ram mandir says jayant patil)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा