Advertisement

शिवसेनेने सामना बंद करून बाबरनामा काढावा, अतुल भातखळकरांचा घणाघात

शिवसेनेने सामना बंद करून बाबरनामा काढावा, अशी घणाघाती टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

शिवसेनेने सामना बंद करून बाबरनामा काढावा, अतुल भातखळकरांचा घणाघात
SHARES

अयोध्येतील रामजन्मभूमी जमीन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करणाऱ्या शिवसेनेविरोधात भाजप दंड थोपटून उभा राहिला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखातून ही मागणी करण्यात आली होती. त्यातच मुंबईतील दादरमध्ये शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याने हे प्रकरण आणखीच चिघळलं आहे. त्यावर प्रतिक्रिया नोंदवताना शिवसेनेने सामना बंद करून बाबरनामा काढावा, अशी घणाघाती टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

अतुल भातखळकर म्हणाले की, राममंदिराच्या धर्मकार्यात अडथळा आणणारी शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते आहे, हे जगाला ठाऊक आहे. काँग्रेस, शिवसेना आदी विरोधकांनी केलेले आरोप बोगस होते हे उघड झालं आहे. सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा, पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा.

हेही वाचा- शिवसेनेने आज आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली!, आशिष शेलारांचा निशाणा

भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आज काँग्रेसच्या नादी लागून राम मंदिर उभारणीत कोलदांडा घालणाऱ्या शिवसेनेविरुद्ध आज फटकार मोर्चाचे आयोजन केलं होते. पोलीस बळाचा वापर करून हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न झाला. पण जनतेचा संताप कसा दडपाल?, असा प्रश्न अतुल भातखळकर यांनी विचारला आहे.

वसूलीसेनेने इटालियन काँग्रेसकडून राम मंदिर आंदोलन बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे. बाबरप्रेमी पप्पू आणि पप्पूच्या मम्मीला खूष करण्यासाठी मंदिर उभारणीला बदनाम करण्याचे आणखीन प्रयत्न होतील. अस्तनीतल्या निखाऱ्यांपासून जनतेने सावध रहावं.

राम मंदिर उभारणीला बदनाम कोण करतंय? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा, आम आदमी पार्टी, डावे… हे सगळे बाबराचे आणि बाबरीचे समर्थक पक्ष आहेत. त्यांना राममंदिर नकोच होतं. आता हे एकवटलेत मंदिर उभारणीत विघ्न आणायला. त्यात भर पडली आहे, ज्वलंत टिपूवादी शिवसेनेची. यांना लक्षात ठेवा… जनता इटालियन लोटांगण घालू, सुपारीबाज रामद्रोह्यांचे 'राम नाम सत्य हैं' केल्याशिवाय राहणार नाही…

भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन त्यांनी जनाबसेने चा बाबरवादी चेहरा देशासमोर उघडा केला. महाराष्ट्रातील नव बाबरवाद्यांचा रामभक्तांपुढे कधीही टिकाव लागणार नाही… शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.


संबंधित विषय
POLL

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे-भाजप यांची युती होईल, असं वाटतं का?
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा