Advertisement

शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने, शिवसेना भवनसमोर राडा

शिवसेना भवनासमोर शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला.

शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने, शिवसेना भवनसमोर राडा
SHARES

मुंबईतील (Mumbai) दादर (Dadar)परिसरातील शिवसेना भवनासमोर (Shivsena Bhavan) शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. अयोध्येतील राम मंदिराच्या ट्रस्टनं जमीन घोटाळा (ayodhya ram mandir land scam) प्रकरणावरून सामनाच्या अग्रलेखाचा निषेध करण्यासाठी भाजपनं फटकार मोर्चा काढला होता.

भाजपचे (Bjp) युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलिसांचा (Mumbai Police) कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चेकरी जमा झाल्यानंतर शिवसैनिकांनी शिवसेना भवनाच्या परिसरात गर्दी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी शिवसेनेचे नेते सदा सरवणकर आणि इतर शिवसैनिक हजर होते. पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. पण, दोन्ही बाजूनं घोषणाबाजी झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि शिवीगाळ केली असा आरोप केला आहे.

“सुरुवात आम्ही केली नाही. सुरुवात त्यांनी केली. आम्ही शांतपणे सेना भवनजवळ असलेल्या पेट्रोलपंपावर उभे होतो. जेव्हा आम्हाला कळलं, भाजपचे कार्यकर्ते सेनाभवनावर हल्ला करणार तेव्हा आम्ही पेट्रोलपंपाजवळ उभे होतो. नंतर आम्हाला कळंल ते तिथून सेना भवनात येत आहेत, म्हणून आम्ही शांतपणे इथे घोषणा देत होतो. आमचे कार्यकर्ते उपस्थित होते. सुरुवात त्यांनी केली,” अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या महिला आघाडीचं नेतृत्व करणाऱ्या श्रद्धा जाधव यांनी प्रतिक्रिया दिली.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी विनाकारण आंदोलन केले होते, त्यांनी शिवसेनेच्या भवनावर जाण्याचा प्रयत्न केला. जर कुणी शिवसेना भवनात घुसण्याचा प्रयत्न करणार असेल तर शिवसैनिक आपल्या स्टाईलनं उत्तर देईलच, ही त्यांची भावना आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.

तर भाजपचे कार्यकर्ते हे शांतपणे आंदोलन करत होते. सामनामध्ये लिहिलेल्या अग्रलेखाच्या विरोधात शांतपणे आंदोलन करण्यात येत होतं, पण शिवसैनिकांनीच कार्यकर्त्यांवर हल्ला केला, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.



हेही वाचा

मराठा आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार

संभाजीराजेंना आंदोलनाऐवजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आवाहन केलं होतं- अजित पवार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा