Advertisement

तुंबलेल्या मुंबईला मुख्यमंत्री की महापालिका जबाबदार?, प्रविण दरेकरांचा सवाल

मुंबईतील तुंबलेल्या पाण्याला मुख्यमंत्री जबाबदार असतील, असं यापूर्वी अनिल परब (anil parab) म्हणाले होते. परंतु आत्ता तुंबलेल्या मुंबईला मुख्यमंत्री जबाबदार की महापालिका जबाबदार? हे त्यांनी सांगावं.

तुंबलेल्या मुंबईला मुख्यमंत्री की महापालिका जबाबदार?, प्रविण दरेकरांचा सवाल
SHARES

पुन्हा एकदा 'मुंबईची तुंबई झाली', मुंबईत पाणी भरवून दाखवलं! मुंबईतील तुंबलेल्या पाण्याला मुख्यमंत्री जबाबदार असतील, असं यापूर्वी अनिल परब (anil parab) म्हणाले होते. परंतु आत्ता तुंबलेल्या मुंबईला मुख्यमंत्री जबाबदार की महापालिका जबाबदार? हे त्यांनी सांगावं, असा सवाल भाजप आमदार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत बोलताना प्रविण दरेकर म्हणाले, गेल्या वर्षी जेव्हा मुंबईत मुसळधार पाऊस (mumbai rains) पडून मुंबई अशीच तुंबली होती, तेव्हा शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी पुन्हा मुंबईत पाणी साचलं तर त्याला मुख्यमंत्री जबाबदार राहतील, असं सांगितलं होतं. त्यामुळे आता त्यांनी मुंबईत तुंबलेल्या पाण्याला जबाबदार कोण महापालिका की मुख्यमंत्री हे सांगावं.

हेही वाचा- “आता ठाकरे सरकार पावसाची जबाबदारीही मोदींवर ढकलेल”

मुंबईत ज्या प्रकारे पावसात जागोजागी पाणी साचलं याकडे पाहता हे पूर्णपणे नियोजनाचं अपयश आहे, असं म्हणावं लागेल. प्रकल्प वेळेत पूर्ण झालेले नाहीत. आणि आता हाय टाईड आणि मुसळधार पाऊस आल्यामुळे मुंबई तुंबल्याचं सांगत आहेत. गेली २० ते २५ वर्षे हाय टाईड आणि मुसळधार पाऊस हा मुंबईत सुरूच आहे, परंतु त्यावर सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत काहीच उपाययोजना का केली नाही. 

त्यामुळे आतातरी मुंबई महापालिकेने (bmc) या सर्व तुंबलेल्या पाण्याची जबाबदारी हाय टाईड आणि पावसावर न ढकलता स्वत: घ्यावी. एवढंच नाही, तर तात्काळ उपाययोजना करत, तुंबलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करावी आणि मुंबईकरांना दिलासा देऊन जनजीवन सुरळीत करावं, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली.  

दरम्यान, पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. १०४ टक्के गाळ काढल्याचा दावा केला गेला. पण नाल्यातील गाळाऐवजी सर्वसामान्यांनी महापालिकेला भरलेल्या करातून माल काढला गेला. १०० कोटीच टार्गेट असणारा १ सचिन वाजे सापडला, पण असे सचिन वाजे ठिकठिकाणी असल्यावर सर्वसामान्य मुंबईकराच्या नशिबी तुंबलेली मुंबई. असं म्हणत महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महापालिकेवर टीका केली.

(bjp leader pravin darekar slams bmc over flood in mumbai rains)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा