Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

“आता ठाकरे सरकार पावसाची जबाबदारीही मोदींवर ढकलेल”

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याने भाजपने मुंबई महापालिका आणि राज्य सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे.

“आता ठाकरे सरकार पावसाची जबाबदारीही मोदींवर ढकलेल”
SHARES

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याने भाजपने (bjp) मुंबई महापालिका आणि राज्य सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. आता ठाकरे सरकार पावसाची जबाबदारीही मोदींवर ढकलेल, असं म्हणत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे.

एक दिवस आधीच मुंबईत दाखल होत मान्सूनने जोरदार बॅटींग केली. मुंबईत मुसळधार पावसामुळे बुधवारी ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. साचलेल्या पाण्यातून वाट काढताना मुंबईकरांचे अक्षरश: हाल झाले. रेल्वे ट्रॅकवरही पाणी आल्याने लोकलवसेवा बंद करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी.एल संतोष, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच इतर भाजप नेत्यांसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर अतुल भातखळकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुंबईतील नालेसफाई आणि पावसाच्या पाण्याचा निचरा यावरून अतुल भातखळकर यांनी महापालिका आणि राज्य सरकारवर टीका केली.  

हेही वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली मुंबईतल्या पावसाची दखल

ते म्हणाले, मुंबई महापालिका (bmc) आणि राज्य सरकार देखील आता बहुतेक पावसाची जबाबादारीही मोदींवर ढकलतील. आणि मोदींनीच यातून मार्ग काढावा, असंही ते म्हणतील. असा टोला लगावला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुंबई महापालिका आयुक्तांनी जर आम्हाला विचारलं, तर आम्ही त्यांना एवढंच सांगू की भ्रष्टाचार कमी करून आता तरी मुंबईतील नालेसफाई नीट करा. ज्या ठिकाणी पाणी साचतं, त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य ती व्यवस्था करा, अशीच आमची त्यांच्याकडे मागणी राहील.

पहिल्याच पावसात पाण्याखाली गेलेल्या हिंदमाता परिसराची पाहणी केली. पंप लावले, पूल बांधले तरीही हिंदमाता परिसरात पाणी तुंबलेच. पूर्वीप्रमाणेच आजुबाजूच्या इमारतींना पाण्याचा वेढा आहे. महापालिका कोट्यवधी रुपये मोजून काय कंत्राटदारांचे खिसे गरम करण्यासाठी कामं काढते? असा सवाल अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला.

महापालिकेतील शिवेसनेच्या नेत्यांचा भ्रष्टाचार आणि त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं संरक्षण यामुळेच मुंबईची दाणादाण उडालीय. महापालिकेने नाले सफाई केली नसून तिजोरी सफाई केली आहे. टक्केवारीच्या मोहात सालाबाद प्रमाणे मुंबई बुडाली. सफाई भ्रष्टाचारातील दोषींना शिक्षा केली तरच मुंबई स्वच्छ होईल, अशी मागणी देखील अतुल भातखळकर यांनी केली.

(bjp mla atul bhatkhalkar slams bmc over flood in mumbai rains)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा