Advertisement

मराठा आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार

‘मराठा क्रांती मूक आंदोलनात’ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर देखील सहभागी होणार आहेत.

मराठा आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार
SHARES

मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात बुधवारपासून मूक आंदोलनास सुरुवात होणार आहे. या ‘मराठा क्रांती मूक आंदोलनात’ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर देखील सहभागी होणार आहेत. वंचित बहुजन आघाडीने ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करताना संभाजीराजे यांनी प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात भेट घेतली होती. “मला शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे. शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर एकत येऊ शकतात, तर मी आणि प्रकाश आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाहीत? ” असं मत यावेळी संभाजीराजेंनी व्यक्त केलं होतं.

हेही वाचा- संभाजीराजेंना आंदोलनाऐवजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आवाहन केलं होतं- अजित पवार

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना खासदार संभाजीराजे यांनी कोल्हापुराला वैचारिक, पुरोगामी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे या आंदोलनाची सुरुवात कोल्हापुरातून करत आहोत, असं सांगितलं. आंदोलनादरम्यान कोणीही कोणत्याही लोकप्रतिनिधींना काहीही उलटसुलट बोलू नये. त्यांचा मान-सन्मान राखून त्यांच्याशी वागा. हे मूक आंदोलन शिस्तीत पार पाडायला हवं. तसंच शांततेत आणि कोरोना प्रतिबंधाच्या सर्व नियमांचं पालन करुन आंदोलन करण्याचं आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे. 

बुधवारी शाहू महाराजांच्या सधामीस्थळाहून या आंदोलनाला सुरूवात होणार आहे. १६ जूनला दहा ते एक या वेळेत उपोषण होणार असून कोल्हापूरात आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर पुढे प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे ५ जिल्ह्यात मूक आंदोलन होईल. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील आमदार, खासदार व तेथील लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात येईल.

(VBA chief prakash ambedkar will be participate in maratha kranti morcha in kolhapur)

हेही वाचा- सर्वसामान्यांसाठी लोकल कधी धावणार? विजय वडेट्टीवार यांनी दिलं स्पष्टीकरण



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा